Our Blog

अभियांत्रिकीनंतर विविध संधींचे प्रवेशद्वार GATE

 

GATE (गेट) - Graduate Aptitude Test in Engineering अर्थात  अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजेच आयआयटी मध्ये पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी देश स्तरावर घेतल्या जाणाऱ्या या पात्रता प्रवेश परीक्षेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अभियांत्रिकीतील बरेचशे विद्यार्थी ह्या परीक्षेला तितकेसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. किंबहुना अधिकतर पालकांना या परीक्षेबाबत माहिती देखील नसते. या लेखातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा संधीचे प्रवेशद्वार कसे  आहे यावरती प्रकाश झोत टाकला आहे. अभियांत्रिकी शिक्षण चालू असतानाच या परीक्षेची तयारी करणे का जरुरीचे आहे तसेच ही परीक्षा देणे इतके का महत्त्वाचे आहे हे पटवून सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध  संधी सविस्तर पाहूया.  

१. पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेशाची संधी ( Entry Exam to M. Tech. )

भारतातील कोणत्याही नामांकित महाविद्यालयात पदवीत्तर शिक्षण घेणाची संधी या परीक्षेमुळे उपलब्ध होते. भारतातील सर्व आयआयटी, एनआयटी तसेच इतर खाजगी महाविद्यालयात पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी गेट परीक्षा देणे बंधनकारक आहे.

M. Tech.  केल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे

१. नोकरीच्या चांगल्या संधी

२. आकर्षक पगार भेटतो 

३. एखाद्या विषयातील विशेषज्ञता 

४. शिकत वेतन मिळवण्याची संधी

५. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या अधिक संधी 

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मधील विविध पदवी व पदवीत्तर कोर्सेसची माहिती घेण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा 

http://www.amgoi.org/admissions/
 

२. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकरीची संधी ( Jobs in PSU- Public Sector Undertaking)

भारत सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्रात व गेटमध्ये सामंजस्य करार केल्यामुळे गेट परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्याना थेट सरकारी नोकरीत संधी उपलब्ध झाली आहे. BSNL, BPCL, NTPC, NHPC, IOCL, BHEL इ.कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

PSU मध्ये नोकरी करण्याचे विद्यार्थ्यांना फायदे  

१. चांगले पगार

२. नोकरीमध्ये स्थिरता 

३. काम व खाजगी आयुष्यात समतोल 

४. उच्च शिक्षणासाठी संधी 

५. इतर सरकारी लाभ
 

३. डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी ( Entry to PhD Courses)

डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी ईच्छूक विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही परीक्षा एक संधी आहे. प्रत्येक विद्यापीठाची वेगळी वेगळी प्रवेश परीक्षा देणे हे परवडण्यासारखे नाही. विद्यार्थी एकाच परीक्षेच्या माध्यमातून भारतातील कोणत्याही विद्यापीठात डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

PhD केल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे

१. परदेशात संशोधन करण्याची संधी

२. आयआयटी, एनआयटी मध्ये शिकत शिकत वेतन मिळवता येते.

३. आयआयटी, एनआयटी मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता

४. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संशोधन करण्यासाठी प्राधान्य.

 

४. परदेशी विद्यापीठात उच्चं शिक्षणाची संधी  ( Entry to MS Programs in Abroad )

National University of Singapur, nanyang Technological University, Singapur, Technical University, Munich in Germany and RWTH Aachen University, Germany या परदेशी विद्यापीठामध्ये  उच्चं शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. गेटला ९०% पेक्षा जास्त स्कोअर असणारे विद्यार्थी पात्र ठरू शकतात.

या विद्यापीठात शिकण्याचे विद्यार्थ्यांना फायदे 

१. जगातील टॉप २० युनिव्हर्सिटी मध्ये समावेश होतो

२. इतर देशाच्या तुलनेने खर्च कमी आहे

३. अद्यावत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेता येते.

४. चांगल्या पगाराच्या नोकरी उपलब्ध होतात.

५. विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेता येतो.

 

५. पदवीत्तर डिप्लोमा करण्याची संधी (Post Graduate Diploma in Management )

National Institute of Industrial Engineering (NITIE) या व्यवस्थापनेशी संबंधित इन्स्टिटयूट मध्ये खालील कोर्सेस मध्ये पदवीत्तर डिप्लोमा करणेची संधी प्राप्त होते. 

१.  Post Graduate Diploma in Industrial Engineering (PGDIE)

२. Post Graduate Diploma in Industrial Management (PGDIM)

३. Post Graduate Diploma in Industrial Safety and Environmental Management (PGDISEM)

४. Post Graduate Diploma in Manufacturing Management(PGDMM)

५. Post Graduate Diploma in Project Management(PGDPM)

हे पदवीत्तर डिप्लोमा करण्याचे विद्यार्थाना फायदे

१. परदेशाच्या तुलनेने कमी खर्च

२. भारत सरकारची जुनी संस्था 

३. नोकरीच्या चांगल्या संधी

४. चांगले पगार 

५. टॉप ५० मध्ये रँकिंग 

 

६. संशोधनाच्या संधी  (Research Opportunities in CSIR laboratories ) 

सी.एस.आय.आर. ने पी.एच.डी. पर्यंत संशोधन करण्यासाठी बी.टेक पदवी प्राप्त झालेल्या गेट पदवीधर विद्यार्थ्यांसाठी २००२ साली नवीन संशोधन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. सीएसआयआर लॅब गेट मार्फत कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) आणि वरिष्ठ संशोधन फेलोशिप (एसआरएफ) ऑफर करते.

CSIR मध्ये फेलोशिप करण्याचे विद्यार्थ्यांना फायदे 

१. पी.एच.डी. करत फेलोशिप करता येते

२. फेलोशिप करत वेतन मिळते

३. CSIR मधील शाश्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी

 

७. प्रायोजकत्व प्राप्त करण्यासाठी संधी ( Sponsorship Opportunities in government job)

Defence, DRDO, BARC, ISRO, NTRO, NAL, KSRTC, BMTC, BDA, PWD and CPRI इत्यादीसारख्या प्रख्यात सरकारी संस्थांबरोबर काम करण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तर गेटचा चांगला गुण तुम्हाला त्यांच्या प्रायोजकत्व कार्यक्रमास पात्र ठरेल. आपणास प्रायोजकत्व मिळाल्यास ते दोन वर्षे चालू राहील. प्रायोजकत्वाच्या लाभासाठी आपले एम.टेक किंवा एमई पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांसाठी त्या संस्थांसाठी काम करणे बंधनकारक राहते. परंतु आपल्याकडे वैध गेट स्कोअर असल्यास आपण अधिक फायद्यासाठी पात्र ठरू शकता.

प्रायोजकत्व मिळवण्याचे  विद्यार्थ्यांना फायदे

१. प्रवेशाचा वेगळा कोटा असतो 

२. नोकरीत पद्दोनितीला फायदेशीर 

 

८. IIM मध्ये फेलोशिप प्रोग्रॅमला जाण्याची संधी ( Fellowship Program in IIM)

आयआयएमने प्रदान केलेल्या “फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट (एफपीएम)” बद्दल गेटची तयारी करत असलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती नाही ज्यामध्ये गेट स्कोअरच्या आधारेही विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या कार्यक्रमाचा कालावधी सहसा सुमारे 4-5 वर्षे असतो. जर एखादा  विद्यार्थी गेटद्वारे एखाद्या चांगल्या संस्थेत प्रवेश करण्यास असमर्थ असेल तर, तो गेट स्कोअरद्वारे एफपीएमसाठी अर्ज करू शकेल.फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट (एफपीएम) हा आयआयएमचा डॉक्टरेट प्रोग्राम आहे. एफपीएमचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील जटिल अडचणी ओळखणे आणि संशोधन करणे आवश्यक कौशल्ये प्रदान करणे.

IIM मध्ये फेलोशिप करण्याचे विद्यार्थ्यांना फायदे 

१. कोणतेही शुल्क आकारले जात नाही

२. बोर्डिंग व लॉजिंगदेखील विनामूल्य आहे

३. वार्षिक आकस्मिक भत्ता

 

९ . स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्ये नोकरीची संधी 

भारतातील काही स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड जसे की West Bengal State Electricity Distribution Company Limited (WBSEDC), Punjab State Power Corporation Limited (PSPCL) and Odisha Power Generation Corporation Limited (OPGEN). यांनी गेट स्कोअरला स्वीकृती दिल्यामुळे या स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डस मध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

यामध्ये नोकरी करण्याचे विद्यार्थ्यांना फायदे  

१. चांगले पगार

२. नोकरीमध्ये स्थिरता 

३. काम व खाजगी आयुष्यात समतोल 

४. इतर सरकारी लाभ 

 

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच संधी उपलब्ध होत आहे. उरतो प्रश्न तो फक्त तयारी चालू करण्याचा. सदर लेखातून अभियांत्रिकी विद्यर्थ्यांसाठी उपलबध असलेल्या वेगवेगळ्या संधीवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. सदर लेख हा नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. संपूर्ण लेख वाचल्याबद्दल आभार.

 

धन्यवाद !!!

प्राध्यापक, महेशकुमार ए. सुतार 

टीप : सदर लेखात थोडक्यात माहिती दिली आहे. पात्रता, निवड पद्धती, फायदे, अर्ज करण्याची माहिती, जाहिरात, अटी, वैधता, वेतन तसेच इतर संबंधीत माहितीसाठी मूळ संकेतस्थळ पाहावे.

 

 

लेखक

 

प्राध्यापक, महेशकुमार ए सुतार  

पी जी कोऑर्डिनेटर ,मेकॅनिकल इंजिनिअरिंग

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव 

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

महाराष्ट्र, पिन ४१६११२ 

मोबाईल : ८६०००६००४२  , 

email : 

mas@amgoi.edu.in , pgproduction@amgoi.edu.in 

C:\Users\user\Downloads\IMG-20160324-WA0000[1].jpg

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक अध्यात्मिक वक्ते असून ते लाईफ व करियर डेव्हलोपमेन्ट मध्ये व्याख्याने देतात.  ते सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये प्राध्यापक  व पी जी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात १७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते सध्या एमटेक चे मार्केटिंग हेड व ऍडमिशन सेलचे सदस्य आहेत