तंत्रक्षेत्रातील बदलांची नांदी बाटू (BATU)
BATU (बाटू) - Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere (District- Raigad) अर्थात महाराष्ट्र राज्याचे एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ.
अभियांत्रिकी बदलत आहे. होय खरोखरच बदलत आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व तत्सम शिक्षण पद्धती बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञान क्षेत्रातील गरज ओळखून बदलू लागली आहे व हे सर्व शक्य होत आहे ते महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे, तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय.
जगामध्ये बहुतांश देशांमध्ये पारंपरिक विद्यापीठ सोडून वेगळी तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. किंबहुना भारतातील कित्येक राज्यांमध्ये स्वतःची तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या नावाने लोणेरे जिल्हा रायगड येथे स्वतंत्र तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना केली आहे. जे महाराष्ट्रात बाटू (BATU) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते.
महाराष्ट्रात पारंपरिक विद्यापीठांचा गौरवशाली इतिहास आहे. ज्यांचा गाजावाजा संपूर्ण जगभर आहे. महाराष्ट्र शासनाने इतर राज्यांच्या धरतीवर स्वतंत्र तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करून महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना या विद्यापीठाशी संलग्न होण्याचे आवाहन केले व संपूर्ण महाराष्ट्राचे या विद्यापीठाकडे लक्ष वेधले गेले. सन २०१६-१७ साली महाराष्ट्रातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या पारंपरिक विद्यापीठातून बाहेर पडून तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्नित होण्याचा निर्णय घेतला व बाटू सर्वत्र चर्चेचा विषय झाला.
बरेच पालक व विद्यार्थी या विद्यापीठा बाबतीत अनभिज्ञ असून त्यांना विद्यापीठ, अभ्यासक्रम, कार्यपद्धती तसेच संधी याबाबत ओळख व्हावी या उद्देशाने विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकत आहोत.
या विद्यापीठाच्या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांसाठी विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करूया.
१. तंत्रशास्त्र विद्यापीठात कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो.
सध्या या विद्यापीठात अभियांत्रिकी, औषधशास्त्र, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.dbatu.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
२. सबसेंटर ही संकल्पना काय आहे.
बाटू हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ असून तांत्रिक शिक्षणासाठी एक छत्री सुविधा पुरविणे हे या विद्यापीठाचे मूळ उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालय व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज सुविधा मिळावी या हेतूने सबसेंटर सुरू करण्याचा बहुउद्देशीय निर्णय या विद्यापीठाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद व जळगाव इत्यादी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र सबसेंटर कार्यरत असून नजिकच्या काळात ही संख्या वाढली जाणार आहे.
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस्, वाठार हे बाटूचे कोल्हापूर सबसेंटर आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी विद्यापीठाचे सुविधा केंद्र नजिकच्या ठिकाणी उपलब्ध झाले आहे.
३. अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये काय आहेत
१. अभ्यासक्रमात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (CBCS) चा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
२. आयआयटी, एनआयटी प्राध्यापक तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ यांच्याकडून अभ्यासक्रम तयार केला जातो. त्यामुळे उद्योग पूरक गोष्टींचा समावेश आहेत.
३. अभ्यासक्रमाचे स्वरूप ६०-४० असे आहे. जसे की थिअरी विषयासाठी ६० गुणांचा विद्यापीठाचा थिअरी पेपर द्यावा लागतो तर ४० गुणांचे महाविद्यालयाकडून कंटिन्युअस मूल्यांकन होते. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल विषयासाठी ४० गुणांचे बाह्य परीक्षकांकडून प्रॅक्टिकल अथवा तोंडी परिक्षेच्या स्वरूपात मूल्यांकन होते तर ६० गुणांचे महाविद्यालयाकडून कंटिन्युअस मूल्यांकन होते.
४. द्वितीय वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक विषय निवडीचे स्वातंत्र्य असून विद्यार्थ्यांसाठी विविध उद्योग पूरक ऐच्छिक विषय उपलब्ध आहेत.
५. अभ्यासक्रमात प्रॅक्टीकल तासांना अधिक प्राधान्य दिले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे.
६. अभ्यासक्रमात समावेश असलेल्या प्रॅक्टिकल व्यतिरिक्त अतिरिक्त प्रॅक्टिकल घेण्याची मुभा असून पारंपरिक पद्धतीसोबत डिजिटल व साॅफ्टवेअर या माध्यमांच्या वापरालाही प्रोत्साहन दिले आहे.
७. तांत्रिक शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये व इतर कौशल्य विकास वाढीवर भर दिला असून एक परिपूर्ण अभियंता घडण्याच्या दृष्टीने विविध गोष्टींचा समावेश प्रथम वर्षापासून केला आहे.
८. प्रथम वर्षापासून इंडस्ट्री इंटर्नशिप चा समावेश केला असल्यामुळे विद्यार्थ्यी सुरूवातीपासूनच इंडस्ट्रीशी जोडला जातो.
९. प्रथम वर्षापासून मिनी प्रोजेक्ट चा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढीस प्रोत्साहन मिळते.
१०. डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत निकाल वेळेत व जलद लावणे शक्य झाले आहे.
११. रिमिडियल परिक्षा निकालानंतर तात्काळ घेण्याची सुविधा असल्यामुळे नापास होण्याचे किंबहुना विद्यार्थ्याचे वर्षे वाया जाण्याचे प्रमाण पारंपरिक विद्यापीठाच्या तुलनेने अत्यल्प झाले आहे.
१२. सत्र चालू असताना कंट्युनिअस असेसमेंट पद्धत असून केवळ पारंपरिक पद्धतीने मुल्यांकन न करता विविध कौशल्य वाढीच्या दृष्टीने आवश्यक मुल्यांकन पद्धत वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक दोघांवरील ताण कमी झाला अाहे.
१३. मूल्यांकनाचे गुण व परिक्षेचा निकाल विद्यार्थी स्वतः च्या लाॅगईन मधून पाहू शकतात त्यामुळे पारदर्शकता वाढली असून मानवी चुका व दुरूस्ती या संदर्भातील समस्येवर तात्काळ निवारण शक्य झाले आहे. पर्यायाने विद्यार्थी तसेच पालकांचा वेळ व पैसा वाचला आहे.
१४. विविध कंपन्यांची गरज ओळखून आवश्यक सॉफ्टवेअर वापराचा समावेश अभ्यासक्रमात केला असून त्यामुळे महागडी सॉफ्टवेअर बाहेरून शिकण्याची गरज पडत नाही पर्यायाने पालकांच्या खिशावरील अतिरिक्त ताण कमी झाला आहे.
१५. अभ्यासक्रम ICT माध्यमांतून शिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे ज्यामध्ये virtual labs, swayam courses, spoken tutorials, NDL इत्यादी केंद्र शासनाच्या डिजिटल इनिशियेटिव्हचा समावेश आहे.
१६ . क्रेडिट साठी विद्यार्थ्यांना स्वयम मधील कोर्सेस निवडण्याची मुभा असल्याने एखादा विषय महाविद्यालया बाहेरील तज्ञ व्यक्ती कडून शिकण्याची संधी उपलब्ध आहे.
१७. तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेनुसार तात्काळ अभ्यासक्रमात बदल केला जातो. ज्यामुळे काळानुसार अद्ययावत अभ्यासक्रमाचा समावेश होतो. जो पारंपरिक विद्यापीठात नेहमीच उणीवेचा विषय ठरला आहे.
४. स्वतंत्र तंत्रशास्त्र विद्यापीठामुळे नेमका काय बदल होणार आहे
या विद्यापीठाच्या स्थापनेचा मूळ उद्देश तांत्रिक शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल करून संशोधनाला चालना देणे आहे. शिवाय या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे एक छत्री सुविधा केंद्र उपलब्ध होत आहे.
१. राज्यात सर्वत्र एकच अभ्यासक्रम राहील त्यामुळे एखाद्या विशिष्ट विद्यापीठाची मक्तेदारी उरणार नाही
२. आतंरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे.
३. तंत्रज्ञानातील संशोधनाला चालना मिळणार आहे.
४. तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावेल.
५. औद्योगिक क्षेत्राच्या गरजेस पूरक अभियंता तयार होणेसाठी मदत होईल पर्यायाने शिक्षण पद्धती व औद्योगिक क्षेत्राची मागणी यामधील दरी कमी होईल.
६. विद्यापीठाशी सामंजस्य करार असणाऱ्या आतंरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी बहुतांश विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.
७. इंडस्ट्री व महाविद्यालयातील संबंध आणखी वृद्धिंगत होतील.
८. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी परदेशी किंवा मोठ्या शहरांवरती जास्त अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
९. अध्यापक वर्गाचा स्तर उंचावला जाईल.
१०. विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयातील संसाधने सामायिक करणे शक्य होईल.
११. तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती व कार्यप्रणाली असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या जलद सुटणार आहे.
१२. औद्योगिक पूरक अभ्यासक्रम असल्याने भविष्यात कंपन्यांची विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करून घेण्यासाठी कल वाढणार आहे
बरीच वर्षे अभियांत्रिकीच्या शाखा पारंपरिक अभ्यासक्रमात गुंतल्या होत्या. बदलत्या तंत्रज्ञानासोबत आवश्यक बदल करायला उशीर होत होता. अभ्यासक्रम इंडस्ट्री पूरक गोष्टी पुरवण्यात कमी पडला होता. किंबहुना ही उणीव बाटू स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण होताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अवलंबलेल्या कार्यपद्धती व कार्यप्रणालीला दिलेले प्राधान्य पाहता तो दिवस फार दूर नाही जेंव्हा तंत्र शिक्षणासाठी बाटू हा एकमात्र पर्याय वाटू लागेल.
येत्या काही काळात केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोक या बदलांचे अनुसरून करताना दिसून येतील. या तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या रूपाने पालक व विद्यार्थ्यांसाठी आलेली ही बदलांची नांदी नक्कीच आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सक्षम व सज्ज आहे.
धन्यवाद !!!
१. प्रा. पी. बी. घेवारी
प्रभारी संचालक, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस्, वाठार
२. प्रा. एम. ए. सुतार
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग
३. प्रा. एस. बी. पाटील
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग
टीप : सदर लेखात मांडलेले मुद्दे हे लेखकांचे वैयक्तिक मत असून हा लेख माहितीत्सव सादर केला आहे. यातील मतांची जबाबदारी संस्था घेत नाही.
#dbatu #amgoi #amgoiblogs
लेखक १
प्राध्यापक प्रवीण बी घेवारी
I/C डायरेक्टर,
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,
वाठार तर्फ वडगाव
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
महाराष्ट्र पिन ४१६११२
मोबाईल : ७९१२८८२८०८,
email : director@amgoi.edu.in
|
|
लेखकाबद्दल थोडक्यात माहिती
लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्राचार्य पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे.
|
लेखक २
प्राध्यापक, महेशकुमार ए सुतार
पी जी कोऑर्डिनेटर ,मेकॅनिकल इंजिनिअरिंग
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,
वाठार तर्फ वडगाव
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
महाराष्ट्र, पिन ४१६११२
मोबाईल : ८६०००६००४२ ,
email :
mas@amgoi.edu.in , pgproduction@amgoi.edu.in
|
|
लेखकाबद्दल थोडक्यात माहिती
लेखक अध्यात्मिक वक्ते असून ते लाईफ व करियर डेव्हलोपमेन्ट मध्ये व्याख्याने देतात. ते सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमध्ये प्राध्यापक व पी जी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात १७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते सध्या एमटेक चे मार्केटिंग हेड व ऍडमिशन सेलचे सदस्य आहेत
|
लेखक ३
प्राध्यापक, सत्यजीत बी. पाटील
पी जी कोऑर्डिनेटर , सिव्हिल इंजिनिअरिंग
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,
वाठार तर्फ वडगाव
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
महाराष्ट्र, पिन ४१६११२
मोबाईल : ९५६११४४९३८ ,
email : sbpatil@amgoi.edu.in
|
|
लेखकाबद्दल थोडक्यात माहिती
लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेमध्ये प्राध्यापक व पी जी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात ११ वर्षाचा अनुभव आहे.
|
|